Website designed with the B12 website builder. Create your own website today.
Start for freeवादग्रस्त वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत राहणारी अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा एकदा नव्या व्हिडिओमुळे वादा सापडली आहे
मराठी न बोलण्यामुळे मराठी भाषेचे नुकसान होत आहे का? त्यांनी जर मराठीमध्ये बोललं नाही तर काय मराठीला भोकं पडणार आहेका?, मराठीमध्ये बोल, मराठी कसे येत नाही, असे म्हणून तुम्ही असुरक्षितता दाखवत आहात, असे केतकी चितळे ने व्हिडिओ मध्ये म्हटले आहे.
केतकी चितळे व्हिडिओ मध्ये पुढे बोलताना म्हणाली की, बाळासाहेब ठाकरे यांचे नातू मिशनरी शाळेत का शिकले तिथे पसायदानहोत नाही, ते चालते. मराठीमध्ये बोलणं किती महत्त्वपूर्ण, गरजेचे आहे, असे ज्ञान ते तुम्हाला देत आहे असे म्हणत तिने व्हिडिओतुन ठाकरे कुटुंबियांवरही टीका केली आहे.
केतकी चितळे म्हणाली की, कुणी मराठी बोलेल कोण बोलणार नाही त्याने मराठी भाषेला नुकसान होत आहे का? भोकं पडत आहेका? असा सवाल तिने केला आहे. त्यावर ते म्हणत की नाही पडत नाही. तुम्ही स्वत:ची असुरक्षितता दाखवत आहात, त्यांना काहीफरक पडत नाही.या गोष्टी मुळे कुणाच्या आयुष्यात काहीही फरक पडत नाही.
अभिजात दर्जा मिळाल्याने उलट असुरक्षितता वाढते.
केतकी चितळे म्हणाली की, 2024 मध्ये मराठी, बंगाली आणि आसामी भाषांना अभिजात दर्जा देण्यासाठी काही निकष ठरवण्यातआले होते.मात्र या निकषावर देखील केतकी चितळेने विरोध केला आहे. त्यावर बोल असताना ती अशी देखील म्हणाली की जरअसा दर्जा द्यायचा असेल, तर तो सर्व भाषांना दिला जावा, असेतीचे वैयक्तिक मत असल्याचे व्हिडिओ सांगत आहे .तसेच अभिजात दर्जाची इच्छा ही असुरक्षिततेतून येते. हिंदी आणि उर्दू या भाषांनाही अभिजात दर्जा मिळालेला नाही, पण त्यासाठी कोणीलढतही नाही. अभिजात दर्जा मिळाल्याने काहीही बदलत नाही, उलट असुरक्षितता वाढते, असं केतकीचं म्हणने
केतकी चितळेंना गांभीर्याने घेऊ नये- दवे
यावर बोलताना हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे असे म्हणाले की,केतकी चितळे हिचा बोलतानाचा व्हिडिओ(Bite )पाहिल्यावर लगेच लक्षात येते की ती कुठल्यातरी नशेच्या प्रवाहात आहे अशी शंका येईल असे त्यांचे बोलणे असते. नेहमी त्या त्याच भाषेतबोलत असतात, त्यामुळे त्यांना फार गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
अमराठी लोकांना एका बाजूला करण्याचा प्रयत्न
आनंद दवे म्हणाले की, चितळेंच्या वक्तव्यानंतर महाराष्ट्राचे जातीय राजकारण आणखी खराब करण्याचे काही कारण नाही, असेमाझे स्पष्ट मत आहे. मराठी न बोलण्याने जर भोकं पडत नसतील तर मराठी बोलण्याने भोकं पडतात का? हा आमचा प्रश्न आहेचना? मुळात हा विषय 100 टक्के राजकीय आहे. राज्यामध्ये मराठी अ अमराठी असे वातावरण कसेही करत तयार करायचे आणिअमराठी लोकं एकत्र आणायचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप दवे यांनी केला आहे.